
सावंतवाडी : ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या कामावेळी ठेकेदाराकडून मारण्यात आलेल्या चरात खडीकरण करून डांबरीकरण न केल्याने खड्डे पडले. यात खड्ड्यात पडून अनेक नागरिक जखमी झाले. पालकमंत्री नितेश राणे या योजनेबाबत नुकतीच मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी या नळपाणी योजनेच्या ठेकेदाराला झापल्याची माहिती आहे. त्यानंतर हा ठेकेदार भानावर आला असून खड्डे बुजविण्याच काम सुरू झालं आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी या योजनेच्या कामाची गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिलेत. तसेच इतरही आवश्यक सुचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर, पीएमसीचे प्रतिनिधी, ठेकेदार आदी उपस्थित होते. यावेळी ठेकेदाराला पालकमंत्री नितेश राणे यांनी झापत सज्जड दम भरला. राणेंच्या इशाऱ्यानंतर भानावर आलेल्या या ठेकेदाराकडून शहरातील खड्डे बुजविण्याच काम सुरू केलं आहे.











