
कुडाळ : प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'कीर्तनगंगा परिवार' आणि 'दत्तमंदिर न्यास, माणगाव' यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही माणगांव येथे भव्य 'आषाढ कीर्तन महोत्सवा' चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव बुधवार, दिनांक १५ जुलै २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.
महोत्सवादरम्यान दररोज नामवंत कीर्तनकारांची सुश्राव्य कीर्तने होणार असून, त्यांचे वेळापत्रक आणि विषय खालीलप्रमाणे आहेत. १५ व १६ जुलै (बुधवार-गुरूवार) वे.श्री अवधूतबुवा धुपकर 'अज - इंदुमती विवाह', १७ जुलै (शुक्रवार) श्री केशवबुवा परांजपे 'सुभद्राहरण', १८ व १९ जुलै (शनिवार-रविवार) श्री दत्तात्रेयबुवा उपाध्ये 'रूक्मिणी स्वयंवर' , २० जुलै (सोमवार) श्री सुपर्णबुवा पोखरणकर 'उषा - अनिरुद्ध विवाह', २१ व २२ जुलै (मंगळवार-बुधवार) वे. श्री भास्करबुवा मुंडले 'दशरथ कौसल्या विवाह' व 'च्यवन सुकन्या विवाह', २३ व २४ जुलै (गुरूवार-शुक्रवार) श्री महेंद्रबुवा पंतमिराशी, 'सीता स्वयंवर' , २५ व २६ जुलै (शनिवार-रविवार)श्री रोहनबुवा पुराणिक 'नल दमयंती' , २७ जुलै (सोमवार) सौ. भावज्ञाताई गावकर - ठाकुरदेसाई 'सुभद्राहरण', २८ व २९ जुलै (मंगळवर-बुधवार) श्री पुरूषोत्तमबुवा पोखरणकर | 'वत्सलाहरण', २९ जुलै रोजी सांगता होणार आहे. या भरगच्च कीर्तन महोत्सवात कीर्तनकारांना उत्कृष्ट सांगीतिक साथ लाभणार आहे:
हार्मोनियम साथ : उदयराज करंबेळकर, धनंजय प्रभुदेसाई, माधव ओगले गुरूजी, वे. पारितोष पोखरणकर आणि प्रद्युम्न माईणकर.
तबला साथ : मंदार करंबेळकर, वे. श्रीपाद मुंडले, अमेय पटवर्धन आणि पार्थ पटवर्धन.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व परिसरातील जास्तीतजास्त कीर्तन रसिकांनी आणि दत्त भक्तांनी या पंधरवड्यात होणाऱ्या 'कीर्तनगंगे'चा आणि ज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आग्रहाचे आवाहन कीर्तनगंगा परिवार, सिंधुदुर्ग व दत्तमंदिर न्यास, माणगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे.











