
देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे आझादनगर येथील धोकादायक वळणावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून रिक्षा वाहन पलटी होऊन अपघात घडला असून हा अपघात सोमवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात निरोम येथील दोन महिलांसह एकूण चार प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे निरोम मधलीवाडी येथील मीनाक्षी सचिन राऊत (३०) या आपला मुलगा सोहम (७) आणि नातेवाईक मनोरमा राऊत, नयना राऊत व आर्या राऊत यांना सोबत घेऊन सोमवारी दुपारी आपल्या माहेरी पडेल येथे जात होत्या. या प्रवासासाठी त्यांनी गावातीलच तेजस प्रकाश नारकर याची रिक्षा भाङघाने घेतली होती. दुपारी ३.३० च्या सुमारास ही रिक्षा जामसंडे आझादनगर येथील एका अत्यंत अवघड वळणावर आली.यावेळी वळण घेताना चालक तेजस नारकर याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा रस्त्यावरच पलटी झाली.यावेळी अपघात घडताच स्थानिक नागरिक्तांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. जामसंडे येथील 'श्री दिर्बा रुग्णवाहिकेचे तेजस देशपांडे यांनी जखमींना सत्काळ रुग्णालयात दाखल केले.
या अपधाताता रिक्षामधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या.रिक्षाचालक तेजस नारकर (३५) याच्या डोक्याला व उजव्या पायाला मोठी इजा झाली आहे. प्रवासी मनोरमा रमेश राऊत (६५) यांच्या उजव्या पायाला, नयना नामदेव राऊत (५३) यांच्या उजव्या हाताला, तर १२ वर्षीय आर्या सचिन राऊत हिच्या हातापायाला गंभीर जखमा झाल्या आहेत.या सर्वांवर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात रिक्षामध्ये बसलेल्या मीनाक्षी राऊत आणि त्यांचा ७ वर्षांचा मुलगा सोहम है दोघेही सुदैवाने पूर्णपणे सुरक्षित आहेत. यावेळी तत्काळ देवगड पोलिसांनी रुग्णालयात जाऊन खमींची विचारपूस केली असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची अधिकृत नोंद करण्याचे काम पोलिस स्थानकात सुरू होते.











