LIVE UPDATES

सावंतवाडी नगरपरिषदेच्यावतीने 'रानभाजी महोत्सवा'चे आयोजन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 25, 2026 21:25 PM
views 32  views

सावंतवाडी : ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण आणि स्थानिक गावठी भाज्यांचे आहारातील महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे, या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेच्यावतीने 'रानभाजी महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते.‌ नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोंसले यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन पार पडले. 

महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पालिका प्रशासन नेहमीच प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी दिली. या महोत्सवात ग्रामीण भागातील तब्बल ३० हून अधिक महिलांनी विविध प्रकारच्या अस्सल गावठी भाज्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या होत्या. यावेळी सभापती दिपाली भालेकर, आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, प्रतीक बांदेकर, नगरसेविका नीलम नाईक, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी वैभव अंधारे, परविन शेख, आसावरी शिरोडकर आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.