LIVE UPDATES

आंबेगाव म्हारकाटेवाडी शाळेला स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलतर्फे वाय-फाय प्रिंटर भेट

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 11, 2026 20:06 PM
views 37  views

सावंतवाडी : ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट – स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने खा. प. शाळा आंबेगाव म्हारकाटेवाडी या शाळेला वाय-फाय प्रिंटर भेट देण्यात आला. या प्रिंटरचा उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात पार पडला.

पाटणकर एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका कश्मिरा रुजुल पाटणकर यांच्या शुभहस्ते प्रिंटरचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सक्षम शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या सामाजिक बांधिलकीतून ही उपयुक्त भेट देण्यात आली. यावेळी कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख संदिप निऊंगरे, BRC सावंतवाडीचे शिक्षक प्रसाद सांगेलकर, संस्था कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पालकवर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान शाळेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच सन्माननीय ॲड. रुजुल पाटणकर आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट – स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी यांचे शाळेच्या गरजा ओळखून वाय-फाय प्रिंटर उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना अधिक गती मिळून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास मदत होणार असल्याचे शाळेच्यावतीने सांगण्यात आले. ट्रस्टच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.