ओटवणे करमळगाळूवाडीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

जि. प.सदस्य विक्रांत सावंत यांची ग्वाही
Edited by: विनायक गांवस
Published on: April 14, 2026 18:39 PM
views 34  views

सावंतवाडी : ओटवणे गावाला गौरवशाली ऐतिहासिक परंपरा आहे. या गावाशी माझे वडील विकास भाईंसह आजोबा भाईसाहेब सावंतांपासून जवळचे नाते आहे. त्यामुळे या गावासह करमळगाळूवाडीच्या विकासासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी दिली.


ओटवणे करमळगाळूवाडीतील लिंग देवस्थान येथे आयोजित कार्यक्रमात विक्रांत सावंत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक दळवी, पंचायत समिती सदस्या उत्त्कर्षा गावकर, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, गावप्रमुख रवींद्र गावकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष सगुण गावकर, गावठणवाडी मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, माजगाव माजी उपसरपंच संजय कानसे, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, प्रशांत बुराण, मनाली गावकर, लावण्या तावडे, कलेश्वर दशावतार मंडळाचे सिद्धेश कलिंगण, पुरोहित विश्वनाथ केळकर, निवृत्त वनपाल गोविंद देवधर, विठ्ठल गावकर, सोसायटी उपाध्यक्ष स्वप्निल उपरकर, निवृत्त शिक्षक मनोहर मयेकर, पोलीस पाटील शेखर गावकर, वायरमन समीर सावंत, दशरथ शृंगारे, सुनिल मेस्त्री, विश्वनाथ बोर्ये, उमेश म्हापसेकर, शशी गोसावी, संतोष तावडे, नरेंद्र कविटकर, शांताराम श्रृंगारे, प्रमोद गावकर

 आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी करमळगाळू वाडीतील अर्जुन तावडे, कांता नाईक, गोरखनाथ भुते, राजन रासम, गजा रासम, विजय तावडे, प्रदीप राणे, लवू तावडे, राजा तावडे, संतोष राऊळ, गिरधर नाईक,  सुदेश तावडे, प्रवीण म्हापसेकर, अभिजीत तावडे, ऋषी तावडे, नामदेव राऊळ, मंगेश गावकर, सदाशिव गावकर, सखाराम गावकर, शरद नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मंडळाचे अश्विनी तावडे यांनी तर आभार अक्षय तावडे यांनी मानले.