डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सावंतवाडीत भव्य मिरवणूक

Edited by: विनायक गांवस
Published on: April 14, 2026 19:11 PM
views 54  views

सावंतवाडी : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त शहरात मोटर रॅली काढून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


समाज मंदिर येथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्याने ही रॅली मार्गस्थ झाली. राजा शिवाजी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच गौतम बुद्ध त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी बुद्ध वंदना, धम्मपालन गाथा, भीमा स्तुती आदी प्रार्थना घेण्यात आली. भिमसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.