
सावंतवाडी : सावंतवाडी येथील माजी मंत्री भाईसाहेब समाधी स्थळाजवळ टाटा मॅजिक व आयशरमध्ये अपघात झाला. सुदैवाने यात मोठी दुर्घटना झाली नसून चालकासह गाडीतल प्रवासी जखमी झालेत. समोरून येणाऱ्या मिक्सरला धडक बसल्याने हा अपघात झाला.
दशावतार नाट्यप्रयोगासाठी टाटा मॅजिक गाडीतून हे कलाकार जात असताना माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधिस्थळी हा अपघात झाला. यात चालक जखमी झाला असून दशावतार कलाकारांना किरकोळ दुखापत झाली आहे. समोरून येणाऱ्या आयशरला धडक बसल्याने हा अपघात झाला असून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.











