
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांनी आज कलमठ गावात भेट दिली. कलमठ गावातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेत यश प्राप्त केलेल्या बाजारपेठ शाळा आणि आदर्श अंगणवाडी भेट देऊन माहिती घेतली. शाळा आणि अंगणवाडी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. सिसिटीव्ही, डिजिटल वर्ग , भौतिक सुविधा, सुशोभीकरण, विद्यार्थी स्नेही वातावरण, वाय -फाय, प्रयोग शाळा यांची पाहणी केली. कलमठ गावात सुरु असलेले उपक्रम आम्ही नेहमी ऐकून आणी वाचून होतो परंतु आज शाळा अंगणवाडीचा प्रत्यक्षात अनुभव घेतला, कलमठ गावातील शाळा अंगणवाडी विकास समाजाला दिशादर्शक असून शहराच्या बाजूला असून पटसंख्या कायम ठेवल्या बद्दल शाळा शिक्षक आणि व्यवस्थापनाचे सौ नारकर यांनी कौतुक करत अभिनंदन केले.
अंगणवाडी आहार बद्दल माहिती घेतली. शैक्षणिक विकासच गावाच्या विकासाची दिशा ठरवतो असे मत यावेळी बोलताना सभापती नारकर यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, स्वप्नील चिंदरकर, मुख्याध्यापक मधुरा सावंत,अनुप वारंग, नितीन पवार, पपू यादव, संतोष रेवंडकर, आबा कोरगावकर, प्रवीण सावंत, प्रणय शिर्के, अभिजित सावंत,अंगणवाडी सेविका पूजा हुन्नरे, प्रमोद पवार, शुभांगी सावंत उपस्थित होते.













