
सावंतवाडी : कोकणची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक वारसा जपणारी ‘आदिनारायण दिनदर्शिका’ २०२६ चे नुकतेच भव्य प्रकाशन करण्यात आले. भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
आदिनारायण दिनदर्शिका ही केवळ तारखांचे साधन नसून ती कोकणच्या लोककला, सण-उत्सव आणि धार्मिक विधींची माहिती देणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानली जाते. कोकणातील प्रत्येक घरातील भिंतीवर या दिनदर्शिकेला मानाचे स्थान मिळावे, या उद्देशाने तिची निर्मिती करण्यात आली आहे.या प्रकाशन सोहळ्याला अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे विशाल परब यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.











