सिंधुदुर्ग सब-ज्युनिअर अ‍ॅथलेटिक स्पर्धा २० जानेवारीला

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 06, 2026 20:41 PM
views 35  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी अ‍ॅथलेटिक असोसिएशनच्या वतीने यंदाची सब-ज्युनिअर अ‍ॅथलेटिक स्पर्धा मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी क्रीडा संकुल, ओरोस येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व खेळाडूंनी सकाळी ८ वाजता मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वयोगट व जन्मतारखा (दिलेल्या कालावधीत जन्मलेले खेळाडू पात्र):

८ वर्षांखालील (मुले व मुली) : ९-२-२०१८ ते ८-२-२०२०

१० वर्षांखालील (मुले व मुली) : ९-२-२०१६ ते ८-२-२०१८

१२ वर्षांखालील (मुले व मुली) : ९-२-२०१४ ते ९-२-२०१६

१४ वर्षांखालील (मुले व मुली) : ९-२-२०१२ ते ८-२-२०१४

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुलांचे जन्म प्रमाणपत्र (मूळ/ओरिजिनल) सादर करणे बंधनकारक असून त्याशिवाय सहभाग मिळणार नाही. प्रवेश शुल्क लागू आहे.

इव्हेंट्स (वयोगटानुसार):

८ वर्षांखालील :

५० मी. धावणे

१०० मी. धावणे

स्टँडिंग ब्रॉड जंप

१० वर्षांखालील :

५० मी. धावणे

१०० मी.धावणे

स्टँडिंग ब्रॉड जंप

गोळा फेक (१ किलो – स्टँडिंग थ्रो)

१२ वर्षांखालील :

६० मी. धावणे

३०० मी. धावणे (मास स्टार्ट)

लांब उडी (५ मी. रन-वे)

गोळा फेक (१ किलो – स्टँडिंग थ्रो)

४×१०० मीटर रिले

१४ वर्षांखालील :

८० मी. धावणे

३०० मीटर धावणे (मास स्टार्ट)

लांब उडी (५ मीटर रन-वे)

गोळा फेक (२ किलो – स्टँडिंग थ्रो)

४×१०० मीटर रिले

राज्यस्तरीय स्पर्धा :

जिल्हास्तरावर पहिले तीन क्रमांक मिळविणारे खेळाडू राज्य सब-ज्युनिअर अ‍ॅथलेटिक स्पर्धेसाठी पात्र ठरणार असून, ही स्पर्धा कोपरगाव, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा येथे ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. राज्य स्पर्धेसाठी प्रवास, निवास व भोजन व्यवस्था स्पर्धकांनी स्वतः करावी लागेल.

जिल्हा स्पर्धेत खेळाडू कोणत्याही ३ इव्हेंट्समध्ये, तर राज्य स्पर्धेत कोणत्याही २ इव्हेंट्समध्ये सहभागी होऊ शकतात. चुकीच्या वयोगटातून सहभाग घेऊन क्रमांक मिळविल्यास संबंधित खेळाडूला स्पर्धेतून बाद करण्यात येईल.

नोंदणी व संपर्क :

स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी कल्पना गजानन तेंडुलकर (सचिव) – ९३५९३९६४५०

बाळकृष्ण कदम – ९१६७४६७७९६ यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन रणजित सिंग राणे, श्री. अजय शिंदे व रामदास देशमुख यांनी केले आहे.