
सावंतवाडी : समाज बांधवांचा सत्कार हा कुटुंबाचा सत्कार मानतो. या सत्कारातून मला निश्चितच ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल, वकिली हा जसा माझा असा अलंकार आहे की जो आयुष्यभर समाजाची सेवा करू शकतो. आता माझी जबाबदारी वाढली असून सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी बहुमताने जनतेने मला निवडून दिले आहे. त्यामुळे समाजासाठी निश्चितच काम करून नगरपरिषदेत दलित समाजाला मिळणारा निधी उपलब्ध करून देताना समाज बांधवांचा सुद्धा मानसन्मान ठेवू, असे प्रतिपादन सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखेच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी पत्रकार सागर चव्हाण, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ शरद जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निरवडेकर म्हणाले, निवडणूक म्हटले की हार जिथे होत असते. माझ्या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून माझ्या समाजाचे तानाजी वाडकर हे होते. त्यांचे काम सुद्धा त्या काळात प्रेरणादायी असेच होते. या समाज मंदिराच्या जागेवर त्यावेळी उकिरडा होता. तो त्यानी बाजूला करून समाज मंदिर सारखी वास्तू उभी केली. आपापल्या परीने त्यांनी काम केले असून मतदारांनी आता मला संधी दिली आहे या संधीचे मी निश्चितच सोनं करेल असे ते म्हणाले. तर पत्रकार सागर चव्हाण म्हणाले, हा सन्मान ज्यांनी माझा जीवन प्रवास खडतर केला त्यांना आपण बहाल करतो असे सांगितले. समाजाकडून झालेल्या सत्काराने आपणास दिलेली ऊर्जा निश्चितच प्रेरणादायी असेल प्रिंट मीडिया सोडून आपण डिजिटल मीडियाचे जाळे सुरू केले. आपल्या जीवनात त्रास देणारे होते तसेच आपल्या सोबतही राहणारे होते. त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकलो असे सांगितले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ शरद जाधव यांनी आपला जीवन प्रवास कथन केला.
या कार्यक्रमास सावंतवाडी शाखेचे तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण सचिव जगदीश चव्हाण ज्येष्ठ सदस्य बाबुराव चव्हाण नरसू रेडकर सूर्यकांत सांगेलकर नरेश कारीवडेकर राजेश फोंडेकर सुनील तुळसकर विजय चव्हाण संदीप बिबवणेकर महादेव पवार संभाजी कांबळे गोविंद चव्हाण,
आदी उपस्थित होते. यावेळी आपल्या मनोगतात निवृत्त माजी सहाय्यक शिक्षणाधिकारी पी बी चव्हाण यांनी नवनिर्वाचित नगरसेवक ॲड अनिल निरवडेकर यांच्या कार्याचा गौरव केला सिंधुदुर्गनगरी येथे उभे राहिलेले संत रोहिदास भवनांचा पाया ॲड निरवडेकर यांनी घातला असून जिथे अन्याय दिसला तिथे उभे राहून न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे काम निश्चितच प्रेरणादायी आहे यावेळी त्यांनी डॉ शरद जाधव आणि सागर चव्हाण यांच्या कामाचा ओहापोह केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश चव्हाण यांनी केले










