'त्या' कुटुंबियांना दिला विशाल परब यांनी आधार

Edited by: विनायक गांवस
Published on: January 05, 2026 13:24 PM
views 44  views

सावंतवाडी : तालुक्यातील ओवळीये येथे एका महिन्यापूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेतील वेर्ले येथील मृत तरुणाच्या घरी भाजपा युवानेते विशाल परब यांनी सांत्वनपर भेट दिली.

सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथे एका महिन्यापूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेत वेर्ले येथील एका तरुणाचा अकाली मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप युवानेते विशाल परब यांनी नुकतीच वेर्ले येथे संबंधित मृत तरुणाच्या निवासस्थानी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. सुमारे महिन्याभरापूर्वी ओवळीये येथे एक दुःखद घटना घडली होती, ज्यामध्ये वेर्ले येथील तरुणाला आपले प्राण गमवावे लागले होते. घराचा आधारस्तंभ असलेला तरुण गेल्याने हे कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले आहे.

यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक भाजप पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.