
वेंगुर्ले : हनुमान जयंती निमित्त भाजपचे युवा नेते विशाल परब व सौ वेदिका विशाल परब यांनी वेंगुर्ले तालुक्यातील मारुतीरायांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी त्याठिकाणी आयोजित धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत श्री मारुतींची मनोभावे पूजा केली.

यावेळी विशाल परब व वेदिका परब यांनी वेंगुर्ले शहरातील राहटाच्या विहिरीकडील मारुती मंदिर, मारुती स्टॉप येथील चारगदा मारुती मंदिर, बाजारपेठ भाजी मार्केट येथील हनुमान मंदिर, जुना स्टॅन्ड येथील हनुमान मंदिरात तसेच कांबळेवीर येथील नवीन स्थापन करण्यात आलेल्या पंचमुखी मारुती मंदिर येथे दर्शन घेतले.
यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेटये, रवी शिरसाट, केतन आजगावकर, श्रीकांत रानडे आदी उपस्थित होते.












