विशाल परब यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्याचं वाटप

Edited by: विनायक गांवस
Published on: July 12, 2024 09:56 AM
views 83  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद शाळा नंबर दोन माठेवाडा येथे  भाजप युवा नेते तथा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यामार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हे शैक्षणिक साहित्य भारतीय जनता पक्षाच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे व माजी सभापती सुधीर आरीवडेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 

यावेळी माजी नगरसेवक राजू बेग, माजी नगरसेविका दिपाली भालेकर माजी नगरसेविका उत्कर्ष सासोलकर, दिलीप भालेकर केतन आजगावकर अमित गवंढळकर,परीक्षीत मांजरेकर, नागेश जगताप, नंदू गावडे,खुशी पवार, राहिल सासोलकर, गौरव बांदेकर ,अनुराधा पवार, अमीषा सासोलकर,आदी उपस्थित होते.