LIVE UPDATES

रवींद्र चव्हाणांच्या वाढदिनी मोफत शिधा वाटप

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 20, 2026 20:36 PM
views 17  views

दोडामार्ग : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोडामार्ग येथील भाजप तालुका कार्यालयात सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या निमित्ताने तालुक्यातील दिव्यांग बांधवांना युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते मोफत शिधा धान्यवाटप करण्यात आले.

वाढदिवसाचा कोणताही वायफळ खर्च न करता समाजातील वंचित व गरजू घटकांना थेट मदत पोहोचवण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमा दरम्यान युवा नेते विशाल परब यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, "रवींद्र चव्हाण यांचा राजकीय व सामाजिक प्रवास नेहमीच सामान्यांच्या सेवेसाठी समर्पित राहिला आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हीच त्यांना दिलेली खऱ्या अर्थाची शुभेच्छा भेट आहे. ​यावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्ष दिपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, चिटणीस सिद्धेश पांगम, शहर अध्यक्ष राजेश फुलारी, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, मीडिया प्रमुख शिरीष नाईक आणि नगरसेवक समीर रेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ​या उपक्रमाबद्दल उपस्थित दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त करत भाजप पदाधिकाऱ्यांचे आणि रवींद्र चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार मानले व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला दोडामार्ग परिसरातील कार्यकर्ते व मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.