LIVE UPDATES

खासदार नारायण राणेंसह कुटुंबीयांनी घेतलं 'सिंधुदुर्गच्या राजा'चं दर्शन

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 20, 2026 20:09 PM
views 51  views

कुडाळ : सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या उत्साहात आज 'सिंधुदुर्गचा राजा'च्या मंडपात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. खासदार नारायण राणे, नीलम राणे आणि आमदार निलेश राणे यांनी आज 'सिंधुदुर्गचा राजा'चे अत्यंत श्रद्धापूर्वक वातावरणात दर्शन घेतले. श्रींच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी संपूर्ण जिल्हावासीयांच्या सुख, समृद्धी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.

'सिंधुदुर्गचा राजा' गणेशोत्सवाची स्थापना झाल्यापासून दरवर्षी राणे कुटुंबीय न चुकता बाप्पाच्या दर्शनाला येतात. हीच परंपरा जपत यंदाही राणे कुटुंबीयांनी बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी श्रींची महाआरती नीलम ताई राणे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडली. महाआरतीनंतर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी, नागरिकांच्या सुखासाठी आणि राणे कुटुंबीयांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी बाप्पाच्या चरणी पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणे घालण्यात आले.

या प्रसंगी भाजप व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये संजय पडते, काका कुडाळकर, विनायक राणे, दीपक नारकर, आनंद शिरवलकर, प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, दिपलक्ष्मी पडते, अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, ॲड. राजीव कुडाळकर, सुनील बांदेकर आणि पप्या तवटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले.