LIVE UPDATES

रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महिला मोर्चातर्फे रुग्णांना फळ वाटप

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 20, 2026 20:23 PM
views 26  views

सावंतवाडी : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी महिला मोर्चातर्फे उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

तसेच चिताराळी येथील महिला निवारा केंद्रांमध्ये महिलांना फळ वाटप आणि खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी महिला मोर्चा शहर अध्यक्षा नगरसेविका मोहिनी मडगावकर, नगरसेविका दिपाली भालेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, मेघा भोगटे, साक्षी गवस, भावना नार्वेकर, तृप्ती विनोडकर, रूपाली रेमुळकर आदी उपस्थित होते.