
देवगड : देवगड तालुक्यातील पेंढारी गावातील लघु पाठबंधाऱ्याचे काम ठेकेदाराच्या मनमाई कारभाळामुळे ग्रामस्थांनी रोखले. लघु पाटबंधारा जिल्हा परिषद कढून बांधण्यात येणारा बंधारा हा पेंढरी भुताचा हेळा येथे होत नसून तो ठेकेदाराच्या मनमाई कारभारामुळे हिरांचा व्हाळ रस्त्यानजिक बांधण्यात येत आहे. या विरुद्ध माजी पंचायत समिती सदस्य दत्ताराम तिर्लोटकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व ग्रामस्थ सुरेश गुरव उपस्थित होते. ग्रामस्थांच्या मागणी नुसार हा बंधारा पेंढरी भुताचा हेळा येतेच व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार ग्रामस्थांनी एकमताने ठवलेल्या जागेवरच हा बंधारा व्हावा अशी पेंढरी गावातील ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थांची दिशाभूल करून ठेकेदाराने तो बंधारा भुताचा हेळा या ठिकाणी न बांधता हिऱ्यांचा व्हाळ या ठिकाणी बांधण्यात येत आहे.