आमदार निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त पडवेत मोफत 'आरोग्य तपासणी शिबिर'

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 14, 2026 20:06 PM
views 33  views

कुडाळ : आमदार  निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडवे (सिंधुदुर्ग) येथे एका भव्य मोफत महा-आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, यामध्ये सर्व विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे.


दिनांक: १७ मार्च २०२६

वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ५:०० वाजेपर्यंत

स्थळ: एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

या शिबिरामध्ये एकाच छताखाली विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व उपचार मिळणार आहेत. यात प्रामुख्याने खालील विभागांचा समावेश आहे:

कर्करोग (Cancer), स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग (Orthopedic), आणि त्वचारोग.

नेत्ररोग, दंतरोग, किडनी विकार, आणि कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञ.

जनरल सर्जरी, जनरल मेडीसीन आणि आहारतज्ज्ञ सल्ला.

तपासणीसोबतच रुग्णांना सोनोग्राफी, एक्स-रे, लॅब तपासणी आणि औषधे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

संपर्क व नोंदणी:

अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:

अनिल कुडपकर: ९४२०९०७६६१

हॉस्पिटल क्रमांक: ८२०८३२८११८ / ९३७००५६०७६

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.