LIVE UPDATES

ज्येष्ठ भजनीसम्राट बुवा भाऊ काका राऊळ यांचं निधन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 25, 2026 20:54 PM
views 39  views

कुडाळ : वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे मायणेवाडी येथील रहिवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित ज्येष्ठ भजनीसम्राट बुवा अभिमन्यु उर्फ भाऊ काका सदाशिव राऊळ (वय ७१)  यांचे काल बुधवारी रात्री आकस्मिक निधन झाले.

भजनीबुवा श्री राऊळ यांनी आपल्या भजनकलेतून परमेश्वरांचे नामस्मरण करता करता सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही मदतीच्या दृष्टीने त्यांनी योगदान दिले होते. मुंबई सेवा समितीचे माजी अध्यक्ष तसेच मायणेवाडीचे एक नेतृत्व करणारे ते लाडके व्यक्तिमत्व होते. मायनेवाडीचा आधार हरपला अशा भावना आज अनेकांनी व्यक्त केल्या.

आज त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले चिकित्सक समुहाचे पाटकर वर्दे  कॉलेज गोरेगांव मुंबईचे मुख्य शेफ अमोल राऊळ यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे भाऊ दोन मुले आणि परिवार आहे