
वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र काजू बोर्डाचे सदस्य मनीष दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या १ ऑगस्ट रोजी परुळे बाजार ग्रामपंचायत क्षेत्रातील गवाण, परुळे बाजार, कर्ली आणि कोरजाई भागातील सर्व अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रसाद पाटकर, परुळे बाजारचे उपसरपंच प्राजक्ता पाटकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष विजय परब, ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण, सिंधुदुर्ग बँक शाखा परुळेचे शाखाधिकारी हंजणकर, माजी उपसरपंच शंकर राठिवडेकर, ग्रामपंचायत सदस्य नमिता परुळेकर, सुनील माडये, दर्शना नाणचे यांसह शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. यावर्षी परुळे पंचक्रोशीतील प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.










