
मालवण : राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आदर्शवत व्यक्तिमत्व मालवण नगरपरिषद बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब मालवण अध्यक्ष श्री. सहदेव बापर्डेकर यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजकोट मित्रमंडळ आणि लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत दैवज्ञ भवन, मालवण येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात येणार असून, गरजू लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. याचबरोबर भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवा आणि रक्तदानाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असल्याने सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवावा,” या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन राजकोट मित्र मंडळ व लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.










