LIVE UPDATES

आईला भेटण्यासाठी माहेरी आलेल्या विवाहितेची आत्महत्या

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट : पोलीस तपास सुरु
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 19:18 PM
views 62  views

कुडाळ : आईची तब्येत बिघडल्याने पिंगुळी येथे माहेरी आलेल्या विवाहितेने घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी 1 ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी मृत महिलेची बहिण स्नेहा आवारे (रा. नाशिक) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मयत महिलेचे नाव प्रतीक्षा प्रकाश म्हाडगुत (वय ४५, रा. वाडोस) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ११.३० ते १२.१० या कालावधीत ही घटना घडली. घराचा पुढील दरवाजा बंद करत घरात कोणीही नसताना प्रतीक्षा यांनी साडीच्या साहाय्याने लोखंडी बाराला गळफास घेत आत्महत्या केली. प्रतीक्षा आणि त्यांची बहिण या दोघी आईची तब्येत ठीक नसल्याने तिची विचारपूस करण्यासाठी पिंगुळी येथे माहेरी आल्या होत्या. प्रतीक्षा या तीन दिवसांपूर्वीच माहेरी आल्या होत्या. घरातील इतर सदस्य बाहेर असताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.