रेडीत क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
Edited by: दिपेश परब
Published on: April 09, 2026 15:39 PM
views 21  views

वेंगुर्ले : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रेडी सरपंच रामसिंग उर्फ भाई राणे यांनी पुरस्कृत केलेल्या व ब्राह्मण क्रिकेट क्लब रेडी आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, सरपंच रामसिंग राणे, पाल सोसायटी चेअरमन कमलेश गावडे, उद्योजक पराग शिरोडकर, उपसरपंच आनंद भिसे, शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, प्रथमेश कामत, नंदू मांजरेकर, स्वप्निल राणे, सागर रेडकर, अनंत कांबळे, कुणाल पीळणकर, जीजी सावंत, आबा राणे, आवेश गवंडी, परेश राऊळ, गोपाळ राऊळ, सागर राणे, भाई कांबळी, अभी आजगावकर आदी उपस्थित होते.  यावेळी उपस्थित मान्यवर शंकर घारे व कमलेश गावडे यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, देवी माऊली ची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.