नारायण राणेंचा वाढदिवस सोहळा ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 09, 2026 17:08 PM
views 53  views

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून, या भव्य सोहळ्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कार्यक्रमाबद्दल उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक कार्याचा उहापोह होणार आहे. कोकणाच्या विकासासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाचा गौरव यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार आहे.

या सोहळ्यासाठी राज्यभरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. विशेषतः नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला राष्ट्रीय पातळीवरील महत्त्व प्राप्त होणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन भव्य स्वरूपात करण्यात येत आहे. खा. नारायण राणे अमृतमहोत्सवी वर्ष समितीकडून सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून, हा सोहळा सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासातील एक लक्षवेधी क्षण ठरणार आहे.