उभादांडा समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवाच्या ३०० पिल्लांना समुद्रात सोडले

Edited by: दिपेश परब
Published on: April 09, 2026 16:34 PM
views 32  views

वेंगुर्ले :  तालुक्यातील उभादांडा समुद्रकिनाऱ्यावर २१ फेब्रुवारी रोजी संवर्धित केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाच्या २९ घरट्यांपैकी एका घरट्यातून आज बाहेर आलेल्या सुमारे ३०० ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांना पंचायत समिती सभापती शंकर घारे व उभादांडा सरपंच निलेश चमणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समुद्रात सोडण्यात आले. 

   उभादांडा येथील समुद्री कासव अंडी उबवणी केंद्राचे कासव मित्र जॅक्सन ब्रिटो व बस्त्याव ब्रिटो गेली अनेक वर्षे ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करून ती अंडी उबवून समुद्रात सोडण्याचे प्रामाणिक काम करत आहेत. यावर्षी त्यांनी २१ फेब्रुवारी रोजी संवर्धन केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाच्या ३९ घरत्यांपैकी एका घरट्यातील सुमारे ३०० ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले बाहेर आली. त्यांना आज समुद्रात सोडण्यात आले. यावेळी कासव मित्र जॅक्सन ब्रिटो व बस्त्याव ब्रिटो, तुळस येथील प्रथमेश ठुंबरे आदी उपस्थित होते.