
वैभववाडी : पंचायत समिती , राज्य कृषी विभाग आणि ग्रामपंचायत नाधवडे यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व शेतकरी मेळावा उद्या बुधवार १जुलैला नाधवडे येथे आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम येथील अष्टकृपा प्रा.लि.कंपनी येथे सकाळी १० वाजता होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती सिद्धेश रावराणे असणार आहेत. तसेच उद्घाटक प्रगतशील शेतकरी किशोर कुडतरकर तर प्रमुख उपस्थिती जि. प सदस्य प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, उपसभापती साची कोलते, प.स. सदस्य मंगेश लोके, सुवर्णा संसारे , साधना नकाशे आदी उपस्थित राहणार आहेत.मेळाव्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ प्रसाद देवधर, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंचायत समितीच्यावतीने करण्यात आलेले आहे.












