LIVE UPDATES

पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त उद्या वैभववाडीत भव्य योग शिबिर व शालेय पुस्तकांचे वाटप

Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: June 20, 2026 19:53 PM
views 35  views

वैभववाडी : जिल्हा परिषद कोकिसरे, वैभववाडी तालुका शिक्षण संस्था व पतंजली योग समिती वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य योग शिबिराचे रविवार २१ला आयोजन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.हे योग शिबिर अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी येथे आयोजित करण्यात आले असून शिबिराची सुरुवात सकाळी ६ वाजता होणार आहे. 

हा संपूर्ण कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ. श्रावणी रोहन रावराणे, वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे नगरसेवक श्री. रोहन जयेंद्र रावराणे तसेच वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबईचे कार्याध्यक्ष श्री. जयेंद्र दत्ताराम रावराणे यांच्या माध्यमातून होणार आहे.  या योग शिबिराला नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.