LIVE UPDATES

अजित गाडगीळ यांना महाराष्ट्र दशावतार कलारत्न गौरव पुरस्कार

Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: June 20, 2026 20:43 PM
views 77  views

सावंतवाडी : मळेवाड येथील युवा दशावतार नाट्यकथा लेखक अजित गाडगीळ यांची त्यांच्या उल्लेखनीय कार्य, योगदान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व यासाठी  युनिव्हर्सल युनिटी फाउंडेशन (रजि.) यांच्या वतीने "सर्वोत्तम व्यक्तिमत्व पुरस्कार सन्मान २०२६" (ठाणे) साठी  निवड करून त्यांना महाराष्ट्र दशावतार कलारत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अजित गाडगीळ यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून, यामुळे अनेकांना दशावतार नाट्य क्षेत्रात दिशा मिळाली आहे. त्यांना मिळालेल्या सन्मानाबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.