
वैभववाडी : सकल हिंदू समाजाच्या वतीने वैभववाडी येथे शनिवार १८एप्रिलला “सकल हिंदू संमेलन” आयोजित करण्यात आले आहे. येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर सायंकाळी ४ते ७या वेळेत हे संमेलन होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुधीर थोरात व प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. सौ. गीता काळे या उपस्थित राहणार आहेत. या संमेलनास सकल हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.











