चराठ्यात गाड्या घसरून अनेकांचे अपघात

ग्रा. पं. कडून कार्यवाही होत नसल्यासे ग्रामस्थांची तीव्र नाराजी
Edited by: विनायाक गांवस
Published on: April 17, 2026 11:01 AM
views 124  views

सावंतवाडी : चराठा टेंबवाडी येथील रस्त्यावर असलेल्या झाडाची जांभळ पडून तसेच शेजारील घरातील पाणी रस्त्यावर आल्याने गाडी घसरून अपघात होत आहेत. आज सकाळपासून जवळपास ५ ते ६ लोक जण गाडीवरून पडून जखमी झाले असून ग्रामपंचायतीचे लक्ष वेधूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याची तीव्र नाराजी चराठा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

ओटवणे-चराठा रस्त्यावर टेंबवाडी येथे रस्त्यालगत असलेल्या जांभळाच्या झाडाची जांभळ पडल्याने तसेच शेजारी असलेल्या घरातील पाणी रस्त्यावर येत असल्याने रस्ता बुळबुळीत झाला आहे. यामुळे गाड्या घसरून अनेकांचे अपघात होत असून आज सकाळपासून ५ ते ६ जण जखमी झालेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला सांगून देखील योग्य कार्यवाही होत नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागत असून मोठी हानी झाल्यावरच ग्रामपंचायतीला जाग येणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.