खांबाळेतील आदिष्टी मंदिराचा १९ व २० ला वर्धापन दिन सोहळा

हभप शिवलीला पाटील यांच किर्तन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 17, 2026 12:21 PM
views 86  views

वैभववाडी :  खांबाळे येथील श्री देवी आदिष्टी मंदिराचा २३ वा वर्धापन दिन सोहळा १९ व २० एप्रिलला होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे.सुप्रसिध्द किर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांचं किर्तन होणार आहे. श्री आदिष्टी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा दोन दिवसीय कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.या उत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवार(ता १९ ) पहाटे ५ ते ७ वा. प्रातःस्मरण व काकड आरती, सकाळी १० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७ वा. हरिपाठ, सायंकाळी ७ ते ८ वा. भजन, रात्री ९ वा. पालखी सोहळा आणि रात्री १० वा. सुप्रसिद्ध किर्तनकार शिवलीला ताई पाटील (सोलापूर) यांचे कीर्तन होणार आहे.दुस-या दिवशी 

दुपारी २.३० वा. हळदीकुंकू कार्यक्रम होईल. रात्री ७ ते १० वा. या वेळेत पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून रात्री १० वा. चिमणी पाखर डान्स अँकॅडमी, कुडाळ आयोजित ‘जलवा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देवी आदिष्टी देवस्थान स्थानिक सल्लागार व्यवस्थापन उपसमितीच्या वतीने करण्यात आले आहे.