आरोग्य दरबार नियोजनबाबत शनिवारी सर्व संस्थांची बैठक

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 16, 2026 21:09 PM
views 22  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गवासियांच्या आरोग्य प्रश्नासंदर्भात 29 एप्रिल 2026 ला सावंतवाडी येथे "जनता आरोग्य दरबार" आयोजित करण्यासंदर्भात सावंतवाडी तालुक्यातील सर्व संस्था, संघटना यांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी 18 एप्रिलला सायंकाळी सहा वाजता आयोजित केली आहे.

कळसुलकर शाळेतील भवानी मंदिरात सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीने आयोजित केलेल्या या बैठकीस सर्व सामाजिक संस्था, आरोग्य विषयक काम करणाऱ्या संस्था, संघटना, मंडळे यांचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकतेँ यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समितीचे एन.बी.रेडकर, राजू केळुसकर यांनी केले आहे. जनता आरोग्य दरबार कार्यक्रमासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनीही निमंत्रित करण्यात येणार आहे. यासंबधीच्या नियोजनात सावंतवाडी तालुक्यातील जास्तीत-जास्त संस्था, मंडळे यांना सहभागी करुन घेण्यासंदर्भात आणि नियोजनाबाबत ही बैठक होणार आहे.