
कणकवली : पर्यावरण रक्षण, लोकशाही मूल्ये आणि जनतेच्या आवाजाला बळ देण्यासाठी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमी पद्मश्री सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने 'जनसही मोहीम' राबवण्यात आली. या अभियानाला नागरिकांसह तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
"तुमची एक सही – लोकशाहीच्या बाजूने एक ठाम पाऊल!" हे ब्रीदवाक्य घेऊन ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकशाही बळकट करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि सोनम वांगचुक यांच्या चळवळीला पाठिंबा देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेत सर्व स्तरांतील लोकांनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दर्शवला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुका प्रमुख उत्तम लोके, तालुका संघटक राजू राठोड, प्रतीक रासम, रोहित गावडे, रवी विचारे, समर्थ म्हसकर, तन्मय सामंत, महेंद्र नाईक, निखिल जाधव, राज विचारे, आदित्य जोशी, लवेश पांचाळ, अनिरुद्ध जगताप, सर्वेश जाधव, साहिल जाधव, सिद्धेश गावडे, हुसेन लदाफ यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी 'पर्यावरण संरक्षण आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सर्वजण सही करून या अभियानात सहभागी होऊया,' असे आवाहन ठाकरे शिवसेनेच्यावतीने यावेळी करण्यात आले.










