दोन दुचाकींचा अपघात ; इसमाचा मृत्यू

Edited by: लवू परब
Published on: March 24, 2026 20:26 PM
views 133  views

दोडामार्ग : झरेबांबर विमानतळ येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात पिलर्णे (गोवा) येथील  ५१ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. जावो बावतीस डिसोजा असे मृत इसमाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वोलवाडो, पिलर्णे, उत्तर गोवा येथील जावो डिसोजा हे मंगळवारी सकाळच्या सुमारास साटेली भेडशी (कुडासे तिठा) येथे असलेल्या एका आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी त्यांच्या होंडा एक्टिवा स्कूटरने जात होते. दरम्यान झरेबांबर-विमानतळ येथे ते आले असता समोरील दुचाकीला त्यांच्या स्कूटरची जोरदार धडक बसली व ते रस्त्यावर कोसळले. परिणामी ते गंभीर जखमी झाले. या मार्गावरून सकाळी कामानिमित्त जाणारे सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांसह बाबा (लक्ष्मण) मयेकर यांनी तत्परता दाखवत मदत कार्य केले. 

संदेश वरक यांनी १०८ नंबर रुग्णवाहिकेला पाचारण केले. संदेश वरक व बाबा मयेकर या दोघांनी जखमीला रुग्णवाहिकेने येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. जखमीवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.