
सावंतवाडी: आखाती देशांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपावर नागरिकांची झुंबड उडाली असून मोठ मोठ्या रांगा लागल्या आहेत. राज्यात काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलचा तुटवडा भासत असून पेट्रोल पंपांवर इंधनासाठी रांगा लागल्या आहेत.
ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर तुटवडा भासत असल्याने ग्राहकांनी शहराच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. शहरातील पेट्रोल पंपावर सध्या मुबलक प्रमाणात पुरवठा असून रात्री १० च्या सुमारास मोठं मोठ्या रांगा पंपावर लागल्या आहेत.इराण-इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची भिती निर्माण झाल्याने ग्राहकांनी पेट्रोल पंपावर धाव घेतल्याचे समजते.











