
दोडामार्ग : दोडामार्ग बांदा राज्य मार्गावर कळणे डबीवाडी येथे काल मंगळवारी एका झाडाची भली मोठी फाडी तुटून रस्त्यावर पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिकांनी ते झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला.
दोडामार्ग - बांदा मार्गावर दुतर्फा अनेक भलीमोठी जुनी झाडे आहेत. काही झाडे कमकुवत झालेली आहेत. त्यातच आज कळणे डबीवाडी येथे एका भल्या मोठ्या झाडाची फांदी तुटून रस्त्यावर पडली. सुदैवाने त्यावेळी कोणतेही वाहन आले नाही म्हणून मोठा अपघात टळला. यावेळी स्थानिकांनी ते झाड बाजूला केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने अशी कमकुवत झाडे तोडून वाहतुकीस होणारा अडथळा दूर करावा अशी मागणी केली आहे.











