
सावंतवाडी : येथील गवळी तिठ्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी बद्दल नाराजी व्यक्त करत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर इथे वाढत चाललेले अनधिकृत विक्रेते आणि मच्छी विक्रेते वाहतूक कोंडीच मुख्य कारण ठरत असल्याने त्यांना हटविण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी दिली.
सावंतवाडीतील वेंगुर्ला बसस्थानकाच्या समोरील भागात हे अनधिकृत व्यावसायिक बसत होते. त्यामुळे वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून अनधिकृत विक्रेत्यांवर नगरपरिषदेतकडून कडक कारवाई केली जाईल असा इशारा नगराध्यक्षांकडून देण्यात आला आहे.










