LIVE UPDATES

माडखोलात घर फोडून अज्ञाताने रोख रक्कमेसह कागदपत्रे लांबवली

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 21, 2026 18:57 PM
views 40  views

सावंतवाडी: माडखोल टेंबवाडी येथील रहिवासी श्री नंदू दळवी यांच्या बंद घराचा मुख्य दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने १२ हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची फाईल चोरून नेल्याची घटना २० जुलै २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घरफोडी प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, दुपारी घर बंद असताना अज्ञात चोरट्याने घराच्या बाजूलाच असलेल्या टिकावाच्या साहाय्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाटाच्या चावीने ते उघडले आणि त्यातील १२ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे असलेली फाईल चोरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्री. लोहकरे, पोलीस जमादार मनोज राऊत आणि पोलीस हवालदार सुरेश धोत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासाला गती देण्यासाठी फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, सावंतवाडी पोलीस या प्रकरणी पुढील अधिक तपास करत आहेत.