
वैभववाडी : भुईबावडा कॉपी प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी संजयकुमार खेमा आडे याला पोलिसांनी सोमवारी रात्री केली अटक केली. संशयिताला आज सायंकाळी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पुरवणी लिहण्यासाठी संशयिताने वापरलेली कारही पोलीसांनी जप्त केली. तसेच संशयिताचा मोबाईलही जप्त करण्यात आला.










