LIVE UPDATES

तरुणांचे व्यवसायातील पाऊल कौतुकास्पद

सुधा कवठणकर यांच्या हस्ते दालनाचे उद्घाटन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 18, 2026 19:29 PM
views 36  views

सावंतवाडी : तालुक्यातील साई कवठणकर यांच्या दालनाचे उद्घाटन आरोंदा-सातार्डा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य सुदन उर्फ सुधा कवठणकर यांच्या हस्ते करण्यात आले. आपले तरूण व्यवसायात पाऊल टाकत असल्याची बाब ही कौतुकास्पद असल्याचे उद्गार श्री. कवठणकर यांनी काढले. 

सातार्डा येथे साई कवठणकर यांनी आपले दालन सुरू केले असून याचे उद्घाटन सुधा कवठणकर यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या काळात आपला युवक उद्योग व्यवसायात दिसत नाही. अशावेळी तरूणांनी व्यवसायाला दिलेल प्राधान्य कौतुकास्पद आहे. युवक-युवतींनी रोजगार देणारा बनाव असंही मत श्री. कवठणकर यांनी व्यक्त केले.