LIVE UPDATES

कबड्डी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल भेडशी संघाला विजेतेपद

आ . केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ पुरस्कृत कबड्डी स्पर्धा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 20, 2026 11:07 AM
views 92  views

सावंतवाडी : माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ पुरस्कृत कबड्डी फेडरेशन सिंधुदुर्ग आयोजित कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, भेडशी दोडामार्ग संघाने विजेतेपद पटकावले.‌ तर वेंगुर्ले बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेजचा संघ उपविजेता ठरला. 

आम. दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त या कबड्डी स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण दिवसभर ही कबड्डी स्पर्धा येथील शांतिनिकेतन स्कूलच्या पटांगणात रंगली. या स्पर्धेत एकुण ८ संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना दोडामार्ग आणि वेंगुर्ला संघात रंगला. यात न्यू इंग्लिश स्कूल भेडशी दोडामार्ग संघाने २८ विरूद्ध ३२ गुण मिळवून विजेतेपदावर आपल नाव कोरले. तर बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेजचा संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात दोन्ही संघात चुरस पहायला मिळाली. हे कबड्डी सामने बघण्यासाठी मोठ्या संख्येने कबड्डी प्रेमी मैदानावर उपस्थित होते. विजेत्यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट पकडसाठी तुकाराम काळे, दोडामार्ग, उत्कृष्ट चढाई प्लेविन रॉड्रिक्स, वेंगुर्ला तर अष्टपैलू खेळाडू म्हणून संकेत सावंत, दोडामार्ग यांना गौरविण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून सी.ए.नाईक, अजय जाधव, मयूर सुभेदार, मोहसीन शेख, मिलिंद निकम, विश्राम नाईक, वसिम शेख, अलिस्का आल्मेडा यांनी काम पाहिले. 

सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला शहरप्रमुख भारती मोरे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड.सायली दुभाषी, स्नेहा नाईक, निता प्रासादी, माजी नगरसेवक संजय पेडणेकर,गजानन नाटेकर, कबड्डी फेडरेशनचे दिनेश चव्हाण, माजी कबड्डीपटू तथा आयोजन प्रमुख प्रसाद देऊलकर, आर.डी.बांदेकर, युवा रक्तदाता संघटनेचे उपाध्यक्ष मेहर पडते, अनिकेत पाटणकर, संदिप निवळे, ॲड.प्रसाद नाटेकर, भास्कर आमुणेकर, बाबा आल्मेडा तसेच मोठ्या संख्येने सावंतवाडी मतदार संघातून आलेले खेळाडू उपस्थित होते.