शिक्षकाने स्वतःला संपवलं

घटनास्थळी सापडली चिठ्ठी
Edited by: विनायक गांवस
Published on: October 11, 2025 13:07 PM
views 2838  views

सावंतवाडी :  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिलेदार, आंबोली गावठण येथे कार्यरत उपशिक्षक आनंद सुरेश कदम (वय ३६) यांनी आपल्या राहत्या घरी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्री निदर्शनास आली. 

रात्री उशीरा गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर आंबोली पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. यांनतर आंबोली पोलीसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडल्याचेही समोर येत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, ६ वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. श्री. कदम हे स्वभावाने मन मिळावू आणि शिक्षणप्रेमी होते. त्यांच्या या निर्णयामुळे हळहळ व्यक्त होत आहे.