LIVE UPDATES

दशावतार कलाकार बहूउद्देशीय संघाने मानले निलेश राणेंचे आभार

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 11, 2026 21:23 PM
views 71  views

मालवण : आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंत यांच्या व्यथा, समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. तळमळीने आमच्या मागण्या ठामपणे अधिवेशनात मांडल्या. आम्हाला खऱ्या अर्थाने शासन दरबारी न्याय मिळवून दिला आहे. याबाबत राज्य सरकार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे, आमचे आमदार निलेश राणे आणि आम्हाला सहकार्य करणारे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत तसेच सर्वांचे आभार. अश्या भावना दशावतार कलाकार बहूउद्देशीय संघ सिंधुदुर्गचे मालवण अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, सल्लागार सुधीर तांडेल व उपस्थित सर्व कलावंत यांनी व्यक्त केल्या आहेत.


दशावतार कलाकार बहूउद्देशीय संघ सिंधुदुर्ग शाखा मालवण कलावंत यांनी शासकीय विश्रामगृह मालवण येथे एकत्र येत आपली भूमिका मांडली. यावेळी दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग मालवण तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, सल्लागार सुधीर तांडेल, चंद्रकांत खोत, सचिव विनायक येरागी, सहसचिव विनोद परब, सदस्य बापू घाडीगावकर, योगेश खोत, पवन वालावलकर, दिलीप सुतार, रवींद्र कोळंबकर, अर्जुन खोबरेकर, भास्कर  मुसळे, यशवंत मांजरेकर, गिरधर  गावकर, उमेश  तुळसकर, महेश तांडेल, पांडुरंग भालेकर, विलास वालावलकर, दिलीप कासवकर, अनिकेत गुळेकर उपस्थित होते.

पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, गेली कित्तेक वर्षे शासकीय योजना, सरकारच्या सहकार्य पासून वंचित असलेल्या दशावतार कलेला आता सुगीचे दिवस येत आहेत. 

2020 या वर्षात आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार कलावंत बहुउद्देश संघ स्थापना केली. आमचा आवाज शासन दरबारी पोचवणे. कलाकारांची नोंद शासनाकडे होऊन त्यांना मदत मिळावी. ही आमची प्रमुख मागणी होती. आम्ही शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट घेतली आमच्या व्यथा मांडल्या. त्यावेळी त्यांनी सांगितले आमदार निलेश राणे यांच्याशी तुमची भेट घडवून देतो आणि त्यांच्या मार्फत तुमचे प्रश्न मार्गी लावतो. त्याप्रमाणे आमची आमदार निलेश राणे यांच्या सोबत भेट झाली. दशावतार कलावंत यांच्या व्यथा, समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. शासन दरबारी आमच्या मागण्या ठामपणे मांडल्या. आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय दिला. असे पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितले.


दशावतार कलाकार बहूउद्देशीय संघटना सिंधुदुर्ग सदस्य तथा मालवण संघटना सल्लागार सुधीर तांडेल यांनी ही आभार व्यक्त केले आहेत. आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही. मात्र आमदार निलेश राणे यांनी आमच्या मागण्याना शासन दरबारीं वाचा फोडली. आम्हाला न्याय मिळवून दिला. आमचा दशावतार कलाकार आजपर्यंत सगळीकडे ज्या तळमळने व्यथा मांडत होता त्याच प्रमाणे आमच्या कुटुंबातील सदस्या प्रमाणे आमच्या व्यथा, आमचे दुःख जाणून त्या मांडण्याचे आणि आम्हाला शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचे काम आमदार निलेश राणे यांनी केले. राज्य शासनाने याची दखल घेत आमचे मानधन वाढवणे, ओळखपत्र देणे, अन्य सुविधा याबाबत घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी केली. याबाबत आम्ही राज्य सरकार, मंत्री आशिष शेलार, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत तसेच पत्रकार बांधव व सर्वांचे दशावतार कलाकार संघटना सल्लागार सुधीर तांडेल व उपस्थित सर्व कलावंत यांनी आभार मानले आहेत.