LIVE UPDATES

अखिल भारतीय पखवाज परीक्षेत स्टेपिंग स्टोन स्कूलचा डंका

विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 05, 2026 12:14 PM
views 37  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या पखवाज परीक्षेत स्टेपिंग स्टोन स्कुलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. इयत्ता ४ थी मधील कु. अभिनव गावस याने प्रथम श्रेणी, तर कु. श्रीपाद पावसकर आणि कु. सोहम हडफडकर याने द्वितीय श्रेणी प्राप्त केली. इयत्ता ६ वी मधील कु. उगम वेर्लेकर याने द्वितीय श्रेणी प्राप्त केली.

 परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील पखवाज शिक्षक संकेत म्हापणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी  दर्शवली.  यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक संकेत म्हापणकर यांचे प्रशालेचे संचालक रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी अभिनंदन केले. त्यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.