
सावंतवाडी : येथील नवसरणी जवळ नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या नळपाणी कामामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. रविवारी सकाळी एक चारचाकी रस्त्याचा अंदाज न आल्याने गटारात गेली. येथील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या मदतीने ही कार बाहेर काढण्यात आली. आतापर्यंत जवळपास ४ अपघात या ठिकाणी झाले असून नगरपरिषद प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शहरातील ठेकेदार निर्मित खड्डयांमुळे होणाऱ्या अपघातातही वाढ होत आहे. यावर नगरपरिषदकडून कोणती ठोस कार्यवाही होते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.










