एसटी - टेम्पोची घाटात धडक

दोन्ही गाड्यांची हानी ; टेम्पो चालक पळून गेल्याने संताप
Edited by: विनायक गांवस
Published on: May 07, 2026 12:02 PM
views 886  views

सावंतवाडी : आंबोली घाटात दाणोळी जवळ एसटी आणि टेम्पोची धडक बसली. यात अपघात होऊन गाड्यांची हानी झाली. गडहिंग्लज मार्गे सावंतवाडी एसटीचा यात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. दरम्यान, टेम्पो चालक न थांबताच पळून गेल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. घटनास्थळी उपस्थितांनी प्रवाशांना मदतीसाठी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी दाखल झालेत.