LIVE UPDATES

मठ येथे पत्रकार के. जी. गावडेंना श्रद्धांजली

निष्ठावान पत्रकार अन् मठ गावचा समाजसेवक हरपल्याची खंत
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 17, 2026 12:44 PM
views 26  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील ३३ वर्षांच्या पत्रकारिकतेत कुणालाही  कसल्याप्रकारे न दुखवता निष्कलंक पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार के. जी. गावडे यांनी राजकीय , सामाजिक, शैक्षणिक, कला-सांस्कृतिक क्षेत्रात आपले संबंध चांगले ठेवते. 

त्यांच्या या कामाबरोबरच मठ गावाच्या विकासकामात मी आणि माझी वाडी या पुरते ते सीमित  न राहता गावातील कुठलेही विकासकाम हे सर्व जनतेच्या सोयी सुविधेसाठी व्हावे यासाठी आमदार किंवा पालकमंत्री तसेच राजकीय पश्नांच्या पदाधिकारी यांच्या मागे लागून ते करून घेण्याची धडपड ते करीत असत. त्यात त्यांचा स्वतःचा कोणताही स्वार्थ नव्हता. 

एवढेच नव्हे तर संत लालाजी मंडळाची स्थापना व लालाजी मंडळाकडे दिवाळीचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असत. त्यातही सर्व  राजकीय प्रश्नांना  लोकप्रतिनिधी  व पदाधिकारी यांनी निमंत्रित करून कार्यक्रमाची यशस्विता साधत त्यांच्या सर्वाशी  प्रेमळ वागण्याच्या स्वभावामुळे ते एक समाजसेवक सुद्धा होते.  एका उत्कृष्ठ व ज्येष्ठ पत्रकाराबरोबरच मठ  गावचा समाजसेवक हरपल्याची खंत उपस्थित मान्यवरांनी के. जी. गावडे यांच्या आयोजित श्रद्धांजली सभेत व्यक्त केली.

   या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्लेचे उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, अँड. एन. पी. मठकर, आरोलकर नर्सरीचे संचालक शिवराम आरोलकर, मठ येथील विकास संस्थेचे चेअरमन सुभाष बोवलेकर, पत्रकार संघाचे सल्लागार प्रदीप सावंत, भरत सातोस्कर, पत्रकार संघाचे माजी मॅक्सी कार्डोज, संत लालाजी मंडळाचे सचिन आईर, सामाजिक कार्यकर्ते दादा गावडे, प्रकाश गावडे, दत्ता कोकरे, बबन परब, उमेश नाईक,  सुधाकर नाईक, देऊ परब, एकनाथ भगत, रामकृष्ण गावडे, आदीसह मठ येथील ग्रामस्थ व के. जी. गावडे हितचिंतक उपस्थित होते.