LIVE UPDATES

गणपतीपुळे मंदिरात आता ड्रेस कोड

शॉर्ट्स-बर्मुडाला प्रवेशबंदी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 17, 2026 12:27 PM
views 25  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

रत्नागिरी : कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारी २०२७ पासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी धार्मिक स्थळाचे पावित्र्य आणि शिस्त लक्षात घेऊन अंगभर व सभ्य पोशाख परिधान करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शॉर्ट्स, बर्मुडा, हाफ पँट, मिनी स्कर्ट तसेच अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांमध्ये मंदिरात प्रवेश करण्यास बंदी असणार आहे.

मंदिर परिसरात यासंदर्भात जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले आहेत. भाविकांनी मंदिराच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धार्मिक आणि पर्यटनस्थळ असल्याने वर्षभर मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे नव्या ड्रेस कोडच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी केली जाते, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

नियम कधीपासून?

१ जानेवारी २०२७ पासून

कपड्यांबाबत काय नियम?

शॉर्ट्स, बर्मुडा, हाफ पँट आणि अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांना प्रवेशबंदी.

भाविकांनी पूर्ण अंग झाकणारा आणि मंदिराच्या वातावरणाला अनुरूप पोशाख परिधान करणे अपेक्षित.